शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

"द अनस्टेबल पीएम कँडिडेट", विरोधकांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमार यांच्या विरोधात पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:56 IST

आजच्या विरोधी पक्षाच्या बैठकीत पहिल्यांदाच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत.

बंगळुरू : भाजपाप्रणित एनडीए असो अथवा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची म्हणजेच यूपीएची बैठक होणार आहे. त्यात सुमारे २६ हून अधिक पक्ष सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुमारे ३० हून अधिक पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बंगळुरूमध्ये मंगळवारी २६ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू होणार आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करण्यात आले. बंगळुरूच्या रस्त्यांवर बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आले, ज्यात नितीश कुमार यांचा द अनस्टेबल पीएम कँडिडेट म्हणजेच 'अस्थिर पंतप्रधान उमेदवार'  (Nitih Kumar) असा उल्लेख करण्यात आला. 

यासोबतच बिहारमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचाही पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आला असून पुलाचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करणारी पोस्टर्स आणि बॅनर्स बंगळुरूमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीपूर्वी चालुक्य सर्कल, विंडसर मनोर ब्रिज आणि हेब्बलजवळील एअरपोर्ट रोडवर लावण्यात आले होते. मात्र, नंतर पोलिसांनी हे बॅनर्स हटवले.

दरम्यान, आजच्या विरोधी पक्षाच्या बैठकीत पहिल्यांदाच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षाच्या एकजुटीला सोनिया गांधी दिशा देतील. सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या या महाबैठकीत अनेक शंकाचे निराकरण केले जाईल. दुसरीकडे शरद पवार-ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते ज्यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही, ते सोनिया गांधींसोबत सहजपणे काम करू शकतात. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसोबत सोनिया गांधींचे सलोख्याचे संबंध आहेत. २०२४ ची लढाई किती तगडी होईल जे बंगळुरूत जमा झालेल्या विरोधी पक्षाच्या एकजुटीवरून दिसते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसPoliticsराजकारण