शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात २ ठार, तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक; पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:05 IST

चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

 

एस.पी. सिन्हा -

पाटणा : बिहारमध्ये सारण लोकसभा मतदारसंघात सोमवारी छपरा येथे लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्यावर मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप झाला आणि मोठा गदारोळ झाला. यानंतर, मंगळवारी सकाळी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमींपैकी एकाचा पाटणा पीएमसीएचमध्ये मृत्यू झाला. तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

चंदन राय आणि गुड्डू राय अशी मृतांची नावे असून मनोज राय यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गदारोळानंतर जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. मुफसिल पोलिस ठाण्याच्या तेलपा भिकारी चौकाजवळ ही घटना घडली. 

सोमवारी मतदानाच्या दरम्यान दोन गटांत हाणामारी झाली होती. एका बाजूला रोहिणी आचार्य तर दुसरीकडे भाजपकडून रमाकांत सिंह सोळंकी या गटांचे नेतृत्व करीत होते. त्यानंतर, आरजेडी कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली.

भाजप निराश आहे. पराभवाच्या भीतीने हिंसाचार झाला आहे. आरजेडीच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हे सहन करणार नाही. सोमवारी मतदानाच्या वेळी उमेदवार म्हणून केंद्रावर फिरत असताना भाजपच्या लोकांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ केली. तेथे भाजपचा निषेध केल्यामुळे मंगळवारी सकाळी तीन आरजेडी कार्यकर्त्यांवर भाजपच्या लोकांनी गोळ्या झाडल्या.       - रोहिणी आचार्य, आरजेडी उमेदवार.

आमची प्रशासनाशी चर्चा झाली आहे. त्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले असून दोघांना अटकही करण्यात आली आहे. निवडणुकीत अशा गोष्टींना थारा नाही. प्रशासनातील लोकांनी याकडे लक्ष द्यावे. याचा हिशेब जनता करत आहे.- तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते, आरजेडी.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BiharबिहारVotingमतदानFiringगोळीबार