गरीबी मुळे हताश मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

By Admin | Updated: November 28, 2014 17:00 IST2014-11-28T16:19:27+5:302014-11-28T17:00:43+5:30

गुजराती चित्रपटात अभिनयकरणा-या आणि मॉडलींग करणा-या एका तरुणीने गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे.

Post mortem due to poverty, the sale of flesh market on social media | गरीबी मुळे हताश मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

गरीबी मुळे हताश मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

>ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. २८ - गुजराती चित्रपटात अभिनयकरणा-या आणि मॉडलींग करणा-या एका तरुणीने गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. वडोद-यात राहणा-या या मॉडेलने आपल्या सोशल मीडिया साइटवर लिहले आहे की, गरीबीपुढे मी हात टेकले असून मी माझ्या शरीराची बोली लावत आहे. माझ्या घरी माझी आई गेली अनेकवर्षे अर्धांगवायुने बिछान्याला खिळून आहे. तर, वडिलांना अपघातात दोन्ही पाय गमवायला लागले असून कुठे कामाकरता विचारले असता लोक शारिरीक संबंधाबद्दल मागणी करतात, माझ्या पुढे पर्याय नसल्याने मी हा मार्ग निवडत आहे. असे या मॉडेलने सोशल मीडियावर लिहले आहे. तसेच संपर्का करता तीने आपला मोबाईल नंहरही दिला आहे. या मॉडेलाच्या जाहीर देह विक्रीच्या बातमीने गुजारतमधील राज्य महिला आयोगाला खडबडून जाग आली असून आयोगाच्या अध्यक्ष लिलाबेन अंकोलिया यांनी असे सांगितले की, राज्यातील रुग्णालये ही अद्यावत असून पिडीत महिला आपली समस्या आमच्याकडे मांडू शकते. तसेच आम्ही सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत असेही त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Post mortem due to poverty, the sale of flesh market on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.