पोस्ट गावगिरी : डिचोली

By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:02+5:302015-09-04T22:46:02+5:30

गावगिरी

Post gossip: Dicholi | पोस्ट गावगिरी : डिचोली

पोस्ट गावगिरी : डिचोली

वगिरी
डिचोली
गोव्यात गेली अनेक वर्षे मटका राजरोसपणे सुरू आहे. या खेळाला कॅसिनोप्रमाणे राजार्शय लाभलेला नसला तरी मांडवीतील तरंगता मटका ज्याला लागतो किंवा लागत नाही त्या व्यक्ती आनंदाने किंवा दु:खाने तरंगताना आढळतात. वर्तमानपत्रांतून अनेक वेळा मटक्यावर पोलिसांनी छापा टाकल्याचे वृत्त प्रसिद्ध होते. मटका खेळात राजरोसपणे होणारी लाखोंची उलाढाल अनधिकृतपणे प्रसिद्ध होत असते, तर छाप्यात जप्त केलेली अधिकृतपणे जाहीर झालेली रक्कम 100 ते 250 रुपयांपर्यंत असते. मटक्याचा निकाल काही वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असे, आता हा निकाल इंटरनेटवर उपलब्ध होत आहे. रोज मटका खेळणार्‍या एका व्यक्तीने हल्लीच सांगितलेली एक बातमी अशी की, हल्ली तेच तेच नंबर पुन्हा पुन्हा येतात, याच्यात फिक्सिंगचा संशय त्याला आहे. त्यामुळे नंबर उघड करणार्‍यांवर कारवाई व्हावी, असे त्याला वाटते; पण कारवाई करणार कोण आणि कोणावर हाच खरा प्रश्न आहे.

दुर्गादास गर्दे

Web Title: Post gossip: Dicholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.