शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

भारत-चीन संबंध आणखी बिघडण्याची शक्यता!अमेरिकी गुप्तहेर खात्याचे म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:36 IST

भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला.

नवी दिल्ली : भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. कोट्स पुढे म्हणाले की, भारत व चीन दरम्यान डोकलामवरुन वाद निर्माण झाला होता. या प्रश्नावर दोन्ही देशांनी चर्चा सुरु केली.अखेर आॅगस्टमध्ये डोकलाममधून आपापले सैन्य मागे घेण्यास तेराजी झाले. असे असले तरीअजूनही भारत व चीन यांच्यातील तणाव संपलेला नसून भविष्याततो आणखी वाढण्याची शक्यताआहे.चीनचे परराष्ट्र मंत्रालय व सरकारी प्रसारमाध्यमे भारताच्या विरोधात सतत आगपाखड करीत असून त्यामुळे या दोन देशांतील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. भारत व चीनने संयम बाळगला, तर या तणावात भर पडणारही नाही. परंतु असे होणे जरा अशक्यच दिसते असे सांगून डॅन कोट्स पुढे म्हणाले की, भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवर चीनने आक्षेपघेतला होता. अरुणाचल प्रदेशवर भारताचा कोणताही हक्क नसून तो दक्षिण तिबेटचा भाग आहे. त्यामुळेतो आमचाच प्रदेश आहे असादावा चीनने नेहमीच केलाआहे.भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांच्यात सीमाप्रश्नासंदर्भात चर्चेची विसावी फेरी नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी२२ डिसेंबर रोजी पार पडली. त्याच्या थोडे आधी चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशची सीमा ओलांडून २०० मीटर आतपर्यंत घुसखोरी करण्याचा प्रकार घडला होता. त्याआधी डोकलाम वाद उफाळून आला.पाकशीही चकमकी सुरूच राहातीलभारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार आहेत. पाकस्तानातील दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करून हल्ले चढविणे सुरूच ठेवले, तर त्याच्या परिणामी दोन्ही देशांच्या सैन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही चकमकी सुरूच राहातील, असेही डॅन कोट्स यांनी सांगितले.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तान