15 ऑगस्टला वाघा बॉर्डरवरील परेडवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता
By Admin | Updated: August 12, 2016 12:56 IST2016-08-12T12:56:13+5:302016-08-12T12:56:13+5:30
पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे

15 ऑगस्टला वाघा बॉर्डरवरील परेडवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता
>
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 12 - स्वातंत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी तालिबान आखत आहे. पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे. दहशतवादी फक्त भारतावरच नाही तर पाकिस्तानवरही हल्ला करण्याची योजना आखत आहेत. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या परेडमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान हल्ला होण्याची भीती आहे. पाकिस्तानने यासंबंधी पंजाब गृह सचिवालयाला यासंबंधी पत्र लिहिलं आहे. तहरिक-ए-तालिबान आणि फजल उल्लाह या दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत आहेत. लाहोरमधील वाघा बॉर्डर किंवा गनदा सिंह बॉर्डवरील परेडवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच दोन आत्मघाती हल्लेखोरांवर या हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचंही पत्रात सांगण्यात आलं आहे.
पाकिस्तानने दिलेल्या अलर्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचं आवाहन भारताला करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाच्या पार्श्वभुमीवर अगोदरच महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. या हल्ल्यात 70 लोकांचा मृत्यू झाला होता.