शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला झटका; एका चुकीमुळे 780 बेनामी मालमत्तांची जप्ती अवैध ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 09:23 IST

७८० हून अधिक बेनामी मालमत्तांच्या जप्तीची कारवाई अवैध ठरण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काळा पैसा खणून काढण्याकरिता व भ्रष्टाचार संपविण्यासाठी मोदी सरकारने बेनामी मालमत्ताविषयक कायद्यात दुरुस्ती करुन नवा कायदा १ नोव्हेंबर २०१६ अमलात आणला. हा कायदा केल्यानंतर पुढील दीड वर्षात त्यासाठी आवश्यक असलेली समिती सरकारने स्थापन न केल्याने ७८० हून अधिक बेनामी मालमत्तांच्या जप्तीची कारवाई अवैध ठरण्याची शक्यता आहे.

१९८८ साली अमलात आलेल्या बेनामी मालमत्ता कायद्यामध्ये सुधारणा करुन नवा कायदा अमलात आणला त्याच महिन्यात मोदी सरकारने नोटाबंदीचे पाऊलही उचलले होते. ज्याची बेनामी मालमत्ता आहे त्या व्यक्तीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच बेनामी मालमत्तेच्या एकुण किमतीच्या २५ टक्के दंड ठोठावण्याची तरतुद नव्या बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्यात करण्यात आली आहे. प्राप्तीकर खात्याने बेनामी मालमत्ता जप्त केल्याची कारवाई वैध आहे की नाही हे ठरविण्यासाठी तीन स्वतंत्र सदस्यांची समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तशी तरतूद या कायद्यातील सातव्या कलमात आहे. मात्र तशी समितीच नेमण्याची बुद्धी सरकारला झालेली नाही....तर लोक न्यायालयात जातीलगेल्या दीड वर्षात ८६०हून बेनामी मालमत्ता प्राप्तीकर खात्याने जप्त केल्या. त्यातील ८० प्रकरणे या समितीकडे पाठविण्यात निश्चित करण्यात आले. पण अन्य ७८० बेनामी मालमत्ता प्रकरणांबाबत कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. अनेक महत्त्वाचे राजकारणी, व्यक्ती, नोकरशहा व अन्य काही जणांच्या या बेनामी मालमत्ता आहेत. पण ज्या समितीकडे ही प्रकरणे पाठवायची तिच स्थापन न झाल्याने सगळा पेच निर्माण झाला आहे. ही समिती योग्य मुदतीत स्थापन न झाल्यास ज्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत ते लोक न्यायालयात धाव घेतील व तिथे केंद्र सरकारची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे असे वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण