शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सीबीआय कोर्टासमोर गुरमीत राम रहीम सिंगला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 11:23 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.  

नवी दिल्ली, दि. 28 -  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.  गुरमीत राम रहीम सिंग याला बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश गुरमीत राम रहीम सिंगला शिक्षा सुनावणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीमला दोषी ठरवण्यात आले आहे, ते दुर्मिळातील दुर्मिळ असे प्रकरण आहे व यामध्ये कठोरातील कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. हे केवळ बलात्काराचे प्रकरण नाही तर पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचे हे गंभीर प्रकरण आहे. 15 वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहीम सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे. 

एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, 'सामान्य प्रकरणापेक्षा हे प्रकरण वेगळे आहे. यात पीडितेसोबत अनेकदा जबरदस्ती करण्यात आली आहे'. सीबीआयनं कोर्टात केलेल्या युक्तीवादानुसार, गुरमीत राम रहीम सिंगनं  2 महिला अनुयायांवर अनेकदा बलात्कार केला. दरम्यान, अधिका-यांनी असेही सांगितले की, बाबा राम रहीम आणि पीडित महिलांमध्ये जवळचे संबंध होते. विश्वास व श्रद्धेचे हे प्रकरण होते. या महिला राम रहीमला गुरू मानत होत्या. मात्र राम रहीमने महिला अनुयायांसोबत आपल्या आध्यात्मिक ताकदीचा गैरवापर  केला. सोबतच या पीडित महिलांचा विश्वासघातही केला. यामुळेच गंभीर स्वरुपाचा हा गुन्हा असून यात कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असेही अधिकारी म्हणालेत

गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे.  एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता.  धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण  गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते.  हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत. 

समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले- पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या. 

सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :crimeगुन्हे