राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेची रक्कम ५०,००० पर्यंत वाढण्याची शक्यता
By Admin | Updated: February 11, 2015 23:54 IST2015-02-11T23:54:26+5:302015-02-11T23:54:26+5:30
गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य (स्वास्थ) विमा योजनेच्या रकमेत २०००० रुपयांची वाढ

राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेची रक्कम ५०,००० पर्यंत वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली : गरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य (स्वास्थ) विमा योजनेच्या रकमेत २०००० रुपयांची वाढ करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सध्या या योजनेत ३०००० रुपयांची विमा सुरक्षा दिली जाते. रुग्णालयातील उपचाराचा खर्च भरून काढता यावा म्हणून सरकारने या विमा सुरक्षा रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
वित्तमंत्री अरुण जेटली हे आगामी अर्थसंकल्प मांडताना या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या ही योजना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत राबविली जात आहे. परंतु यापुढे ती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार आहे. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने २००८ मध्ये ही योजना लागू करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)