कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:20+5:302015-01-22T00:07:20+5:30
तापमानात वाढ : थंडी गायब होण्याच्या मार्गावर

कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
त पमानात वाढ : थंडी गायब होण्याच्या मार्गावरपुणे : ऐन हिवाळ्यात राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत. पुढील ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.राज्याच्या बहुतांशी भागातून मंगळवारी थंडीचे प्रमाण कमी झाले होते. पुढील २-३ दिवसांत थंडी गायब होण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमान नागपूरमध्ये नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नांदेड व चंद्रपूरचे तापमान ९ अंश सेल्सिअस होते. या तीन शहरांचेच तापमान दहा अंशाच्या खाली होते. उर्वरित सर्व शहरांच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी शहरांचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे या भागातून थंडी गायब झाली आहे.प्रमुख शहरांमधील किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.४, अहमदनगर १०.७, जळगाव १२.२, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १३.२, मालेगाव ११.५, सांगली १५, सातारा १३.३, सोलापूर १६.७, मुंबई २०.६, अलिबाग १८, रत्नागिरी १७, डहाणू १७.४, भिरा १३.५, उस्मानाबाद १३.४, औरंगाबाद १४.८, परभणी १५.४, नांदेड ९, बीड १५.६, अकोला १४.५, अमरावती १२.२, बुलडाणा १५.६, ब्रम्हपूरी १०.७, चंद्रपूर ९, नागपूर ८.६, वाशिम १७.४, वर्धा ११.५, यवतमाळ १३.४. (प्रतिनिधी)