शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:42 IST

भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे

नवी दिल्ली : भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या एका शेजारी देशाच्या कुटिल कारवाया अजूनही सुरूच असल्याने समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता कायम आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता केले.नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर दिवसभराच्या सफरीसाठी गेलेल्या राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना अशी ग्वाही दिली दिली की, भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावर नौदलाची प्रबळ उपस्थिती असल्याने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती कदापि होऊ दिली जाऊ शकत नाही.ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत काय झाले हे कदापि विसरता येणार नाही. एकदा झालेली चूक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा होऊ दिली जाऊ शकत नाही. म्हणूनच आपले नौदल आणि तटरक्षकदल सदैव तत्पर असतात. याविषयी जराही शंका घेणचे कारण नाही. समुद्रमार्गे पुन्हा हल्ला होण्याच्या शक्यतेविषयी विचारता संरक्षणमंत्री म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाला स्वत:च्या संरक्षणासाठी चोख उपाय योजावेच लागतात. भारताने हवाई हल्ला करून उद््ध्वस्त केलेला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील प्रशिक्षण तळ पाकिस्तानने पुन्हा सुरू केला आहे व तेथे प्रशिक्षण दिलेले दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत सीमेवर आहेत, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच म्हटले होते. त्याविषयी विचारता राजनाथ सिंह म्हणाले की, हे दहशतवादी कोण पाठविते हे जसे सर्व जगाला माहीत आहे.पाकने युद्धाचा विचारही करू नयेपाकिस्तानने भारताशी पुन्हा युद्ध करण्याचा विचारही करू नये, असे स्पष्टपणे बजावताना शनिवारी मुंबईत राजनाथसिंह म्हणाले होते की, सरकारचा दृढ निर्धार आणि ‘आयएनएस खंदेरी’ विनाशिकेसह अन्य युद्धनौकांनी भारतीय नौदलाचे वाढलेले बळ पाहता आता युद्ध झाल्यास १९७१ पेक्षाही मोठी हानी पाकिस्तानला सोसावी लागेल.

टॅग्स :TerrorismदहशतवादRajnath Singhराजनाथ सिंह