जोड्यातील कॅमेऱ्याद्वारे महिलेचे अश्लील शूटिंग

By Admin | Updated: September 28, 2015 23:54 IST2015-09-28T23:54:23+5:302015-09-28T23:54:23+5:30

दक्षिण दिल्लीच्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्कर्ट परिधान केलेल्या एका महिलेच्या अवयवांचे जोड्यात

Pornography of a woman by a pair of cameras | जोड्यातील कॅमेऱ्याद्वारे महिलेचे अश्लील शूटिंग

जोड्यातील कॅमेऱ्याद्वारे महिलेचे अश्लील शूटिंग

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीच्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्कर्ट परिधान केलेल्या एका महिलेच्या अवयवांचे जोड्यात बसविलेल्या स्पाय कॅमेऱ्याद्वारे अश्लील शुटिंग करू पाहणाऱ्या एका ३४ वर्षीय वकिलाला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलिसांनी रविवारी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी चालविली आहे.
तो कंपन्यांसाठी वकिली करीत असून हरियाणातील ग्राहक मंचाच्या माजी अध्यक्षाचा मुलगा आहे. तो मॉलमध्ये एका महिलेच्या मागे उभा राहून उजवा पाय सरकवत संशयास्पद हालचाली करीत असल्याचे मॉलच्या व्यवस्थापकाला आढळून आले. व्यवस्थापकाने त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो घाईघाईत निघून गेला; मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे छुपा कॅमेरा आढळून आला. त्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१२ अश्लील क्लिप
पोलिसांना त्याच्याकडे १२ अश्लील क्लिप्स आढळून आल्या. त्याने त्या वैयक्तिक वापरासाठी साठवून ठेवल्या की इंटरनेट साईटवर अपलोड करणार होता ते समजू शकले नाही. एका साईटवर मिळविलेल्या माहितीच्या आधारे त्याने आॅनलाईन पोर्टलवरून हा कॅमेरा खरेदी केला होता. उजव्या जोड्यात तो बसविल्यानंतर महिलांचे अश्लील चित्रण करण्यासाठी तो वापरणार होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Pornography of a woman by a pair of cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.