अश्लीलता गेलला भोवणार ?

By Admin | Updated: January 6, 2016 18:22 IST2016-01-06T18:05:52+5:302016-01-06T18:22:22+5:30

असभ्य वर्तन केल्यामुळे चर्चेत आलेला वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलने आणखी काही महिलांसोबत असेच गैरवर्तन वर्तन केल्याचे समोर आले आहे.

Pornography will roam Gayle? | अश्लीलता गेलला भोवणार ?

अश्लीलता गेलला भोवणार ?

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ६ -  वाहिनीच्या महिला निवेदिकेबरोबर  बोलताना असभ्य वर्तन केल्यामुळे चर्चेत आलेला वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलने आणखी काही महिलांसोबत असेच गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. एका ऑस्ट्रेलियन महिलेने ख्रिस गेलवर गुप्तांग दाखवल्याचा आरोप केला असून हा आरोप सिध्द झाला तर, ख्रिस गेलची बिग बॅश लीगमधून हकालपट्टी होऊ शकते. 
आरोप करणारी महिला वेस्ट इंडिजच्या सपोर्ट स्टाफची सदस्य होती. २०१५ च्या वर्ल्ड कपच्या दरम्यान ही घटना घडली होती. सिडनीच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघाचा सराव सुरु होता. त्यावेळी या ऑस्ट्रेलियन महिलेला भूक लागली म्हणून ती सॅंण्डविच खाण्यासाठी ड्रेसिंगरुममध्ये गेली. त्यावेळी गेलने कमरेभोवती टॉवेल गुंडाळले होते. या महिलेला ड्रेसिंगरुममध्ये पाहताच गेलने कमरेभोवती गुंडाळलेले टॉवेल सोडले आणि तू हे शोधत आहेस का ? असे विचारले. 
अलीकडेच गेलचा एका वाहिनीच्या महिला निवेदीकेबरोबर बोलताना तोल सुटला होता. तुझे डोळे फार सुंदर आहेत, आपण ड्रींकला भेटू अशी आशा करतो. तू लाजू नकोस असे गेल या महिला निवेदिकेला म्हणाला. यावरुन गेलवर टीकेचा भडीमार सुरु असताना आणखी एका महिलेने गेलवर गंभीरस्वरुपाचा आरोप केला आहे. 

Web Title: Pornography will roam Gayle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.