मेरठ : मेरठच्या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयात रशियन नर्तिकेचे अर्धनग्न नृत्य झाले व या पार्टीसाठी रुग्णवाहिकेतून दारूच्या पेट्या नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.लाला लजपतराय वैद्यकीय महाविद्यालयाचे यंदा रजत महोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त ओली पार्टी, अश्लील नृत्य असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याचे बिंग फुटले व त्या पार्टीला हजेरी लावणारे अनेक डॉक्टर्स व विद्यार्थ्यांनी कोणकोणते रंग उधळले, ते साºया जगाला कळाले. या व्हिडिओमध्ये रशियन नर्तिका अर्धनग्न अवस्थेत नृत्य करताना दिसत आहे व रुग्णवाहिकेतून दारूच्या पेट्या नेताना दिसत आहेत.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. गर्ग त्यावेळी रजेवर होते. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली़
वैद्यकीय महाविद्यालयात अश्लील नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:55 IST