शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:15 IST

Jammu Kashmir Poonch Terrorist Attack : शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला.

Poonch Terrorist Attack : शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला, ज्यात चार जवान जखमी झाले आणि एक जवान शहीद झाला. शहीद जवानाचे नाव विकी पहाडे असून, ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी होते. या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना हेलिकॉप्टरमधून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रात्री उशिरा उपचारादरम्यान विकी पहाडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

या हल्ल्यात विकी पहाडे गंभीर जखमी झाले होते. जवान विकी पहाडे हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई (दुलारी पहाडे), पत्नी (रीना पहाडे), मुलगा हार्दिक आणि तीन बहिणी असा परिवार आहे, तर वडील दिमक पहाडे यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी संरक्षण दलाच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर चार  जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे. पूंछ हा त्याच मतदारसंघाचा भाग आहे.

संरक्षण दलाची दोन वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशिधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय रायफल युनिटच्या जवानांनी शशिधर भागाला वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पूंछ शहरामध्ये व परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच निमलष्करी जवानांनी शुक्रवारपासून त्या शहरात काही ठिकाणी धाडी घातल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीदIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकTerror Attackदहशतवादी हल्ला