सेल्फीच्या नादात धावपटू पूजा कुमारीचा मृत्यू
By Admin | Updated: August 1, 2016 05:31 IST2016-08-01T05:31:51+5:302016-08-01T05:31:51+5:30
भारताची युवा अॅथलीट पुजा कुमारी हीचा भोपाळ येथील साई सेंटर जवळ असलेल्या तलावात शनिवारी बुडून मृत्यू झाला

सेल्फीच्या नादात धावपटू पूजा कुमारीचा मृत्यू
भोपाळ : भारताची युवा अॅथलीट पुजा कुमारी हीचा भोपाळ येथील साई सेंटर जवळ असलेल्या तलावात शनिवारी बुडून मृत्यू झाला आहे. मत्स्योत्पालनासाठी बनवलेल्या या तलावातील माशांसोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या पुजाचा पाय घसरला आणि ती तलावात बुडाली.
स्टिपलचेस या प्रकारातील धावपटू असलेली २० वर्षीय पुजा आपल्या दोन सहकारी खेळाडूंसोबत सराव करून परतत होती. त्यावेळी या तिघी खेळाडूंनी तलावात मासे पाहिले. या माशांसोबत सेल्फी काढण्यासाठी पुजा तलावाच्या जवळ गेली. मात्र अचानक तीचा पाय घसरला आणि ती बुडाली. पुजा आणि तीच्यासोबत असलेल्या दोघींना पोहता येत नव्हते. या खेळाडू मदत मागण्यासाठी वसती गृहाकडे धावल्या. मात्र मदत पोहचेपर्यंत पुजाचा मृत्यू झाला होता.
दुर्घटना घडली हा तलाव साई सेंटर क्रिकेट मैदानाच्या पाठीमागे आहे. उत्तराखंडची असलेली पुजा कुमारी गेल्या तीन वर्षांपासून साईमध्ये स्टिपलचेसचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी २००० मीटर मध्ये तीने रौप्य पदकही पटकावले. (वृत्तसंस्था)