शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 02:26 IST

पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत.

नवी दिल्ली : पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत.ईडीने शनिवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. ईडीने म्हटले की, हरियाणाच्या हिसारमधील फ्यूचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. ही कंपनी आणि तिचे दोन संचालक राधेश्याम व बन्सीलाल तसेच त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या मालकीच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्यात भूखंड, शेतजमिनी आणि निवासी इमारती यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.हिसार, आदमपूर, कुलाम, दिल्ली आणि चंदीगड येथील १६ स्थावर मालमत्ता, तसेच ३४ बँक खात्यांतील २५२ कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य २६१ कोटी रुपये आहे, असे ईडीने म्हटलेआहे.योजनेचे सदस्य होण्यासाठीही लोकांकडून पैसे घेतले जात असत. कंपनीने देशभरात आपले जाळे निर्माण केले होते. या योजनेतून कंपनीने कोट्यवधी रुपये उभे केले. हा पैसा बेकायदेशीररीत्या कंपनीचे संचालक, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक खात्यावर वळता करण्यात आला.मार्चमध्ये तेलंगणा पोलिसांकडून कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. ‘दरमहा २० हजार ते १० लाख रुपये कमावण्याची जीवनाला कलाटणी देणारी संधी’ अशी जाहिरातबाजी करून कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते.पिरॅमिड मार्केटिंग योजनेद्वारे कपडे आणि खाद्य पदार्थ यासारख्या वस्तू विकून भरमसाट कमिशन देण्याचे आमिष दाखविले. लवकर फसू शकणारे लोक कंपनीचे मुख्य टार्गेट होते. नवीन सदस्य जोडण्यासाठी आधीच्या सदस्यांना भरमसाट कमिशन दिले जात होते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय