निवृत्तीनगरात पोंगलचे २३ रोजी आयोजन

By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:26+5:302016-02-23T00:03:26+5:30

जळगाव- निवृत्तीनगरातील जुन्या जैन फॅक्टरीनजीक असलेल्या केरळी महिला ट्रस्टच्या कार्तीक स्वामी मंदिरात २३ रोजी पोंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परंपरेनुसार मंदिराच्या आवारात मातीच्या भांड्यात खीर तयार केली जाईल. ती सूर्यदेवास नैवैद्य म्हणून दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून भक्तगण, महिलांना खीर दिली जाईल, अशी माहिती केरळी महिला ट्रस्टच्या संस्थापक वासंती अय्यर यांनी दिली.

Pongal organized on 23rd anniversary | निवृत्तीनगरात पोंगलचे २३ रोजी आयोजन

निवृत्तीनगरात पोंगलचे २३ रोजी आयोजन

गाव- निवृत्तीनगरातील जुन्या जैन फॅक्टरीनजीक असलेल्या केरळी महिला ट्रस्टच्या कार्तीक स्वामी मंदिरात २३ रोजी पोंगल उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त परंपरेनुसार मंदिराच्या आवारात मातीच्या भांड्यात खीर तयार केली जाईल. ती सूर्यदेवास नैवैद्य म्हणून दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून भक्तगण, महिलांना खीर दिली जाईल, अशी माहिती केरळी महिला ट्रस्टच्या संस्थापक वासंती अय्यर यांनी दिली.
मंगळवारी, २३ रोजी सकाळी दीड वाजता उत्सवाला सुरुवात होईल. दुपारी दीड वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाखी खुले राहील. या वेळी भाविक पूजा, अभिषेक व पोंगल प्रसादाचा नैवैद्य कार्तीक स्वामींना अर्पण करू शकतील. प्रसाद तयार करण्यासाठी चूल व महाप्रसादाचे साहित्य स्वत: आणावे. यानिमित्त केरळी ब्राह्मणांना बोलावून कार्तीक स्वामींचा अभिषेक करण्यात येणार आहे. स्त्रीयांना वर्षातून एकदाच कार्तीक स्वामींचे दर्शन घेता येते. पोंगलच्या वेळेस स्वामींचे दर्शन, पूजन केल्यास भरभराट होते, अशी मान्यता आहे. यानिमित्त येणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप केले जाईल. तसेच मंडप उभारला जाईल, असेही म्हटले आहे.

नाशिकनंतर उत्तर महाराष्ट्रात फक्त शहरात कार्तीक स्वामींचे मंदिर आहे. २००१ मध्ये त्याची स्थापना झाली. दरवर्षी शेकडो महिला नवस फेडण्यासाठी येतात. अनेक भाविकांनी मंदिर ट्रस्टला मदत केली आहे, असेही अय्यर म्हणाल्या.

Web Title: Pongal organized on 23rd anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.