मंत्र्याचा चक्क बसने प्रवास, कंडक्टरकडून तिकीट घेताना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:05 PM2020-01-04T15:05:06+5:302020-01-04T15:05:34+5:30

सहकारी पेट्रोल पंपावरुन त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार देण्यात आला होता

pondicherry Minister's tour by bus, video taken while conducting ticket from conductor | मंत्र्याचा चक्क बसने प्रवास, कंडक्टरकडून तिकीट घेताना व्हिडीओ व्हायरल

मंत्र्याचा चक्क बसने प्रवास, कंडक्टरकडून तिकीट घेताना व्हिडीओ व्हायरल

Next

पदुच्चेरी - पदुच्चेरी राज्यातील मंत्री आर. कमलाकन्नन यांनी चक्क बसने प्रवास केला आहे. मंत्रिमंडळाच्या एका बैठकीला हजर राहण्यासाठी त्यांना शहराच्या ठिकाणी जायचे होते. त्यासाठी, त्यांनी थेट बसने प्रवास केला. मंत्र्यांना बसमध्ये पाहून कंडक्टर, ड्रायव्हरसह बसमधील प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पदुच्चेरीतील सोशल मीडियात बस कंटक्टरकडून तिकीट घेताना, कमलाकन्नन यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सहकारी पेट्रोल पंपावरुन त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर, त्यांनी चक्क बसने प्रवास करत मिटींगसाठी प्रस्थान केले. सरकारी विभागाकडे यापूर्वीचीही पेट्रोलची बाकी शिल्लक आहे. अद्यापही सरकारने पेट्रोलचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे, येथील एका सहकारी पेट्रोल पंपावर त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना बसने प्रवास करावा लागला. दरम्यान, राज्य सरकाडून या को-ऑपरेटीव्ह पेट्रोल पंपाचे 2.5 कोटी रुपये रक्कम देणे बाकी आहे. त्यामुळे, जोपर्यंत जुनी बाकी जमा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही सरकारी गाडीत पेट्रोल न भरण्याच या पंप मॅनेजमेंटने ठरवले आहे. 


 

Web Title: pondicherry Minister's tour by bus, video taken while conducting ticket from conductor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.