शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ५ नद्या करणार प्रदूषणमुक्त; गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 05:39 IST

प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या कामासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याला केंद्राकडून एक रुपयाही मिळालेला नाही.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या कामासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याला केंद्राकडून एक रुपयाही मिळालेला नाही.पर्यावरण-वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशभरातील ७६ शहरांतील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी ४,५८० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यात महाराष्टÑातील योजनांसाठी ११८३ कोटी खर्च येईल, असा अंदाज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्टÑात होणारा खर्च सर्वाधिक आहे. या प्रकल्पानुसार प्रतिदिन २६० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले आहेत.विविध योजनांसाठी राज्यांना २,२३७ कोटी रुपयांची केंद्रीय मदत देण्यात आली आहे. यामुळे देशभरात अशा संयंत्राची क्षमता २४४६.४३ एमएलडीपर्यंत गेली आहे.- राज्यातील तीन शहरांत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांची क्षमता १२७ एमएलडी करण्यात आली आहे.कृष्णा नदीतील प्रदूषण कमी करण्यास कराड आणि सांगली येथे सांडपाणी नदीत सोडण्यापासून पायबंद घालणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी २८.७४ कोटी रुपये खर्च करून ५५ एमएलडीचे संयंत्र उभारण्यात आले आहेत.- 87.12कोटी रुपये महाराष्टÑातील नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सांडपाणी प्रक्रिया, गटारांचा प्रवाह रोखणे आणि दिशा बदलणे, साफसफाई, नद्यांवरील काठांचाविकास, स्मशानगृह आदी कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :riverनदीMaharashtraमहाराष्ट्र