शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांचे प्रदूषित भाग सतत वाढत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 01:09 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष; देशात दोन वर्षांपूर्वी ३०२, आता ३५१

नवी दिल्ली : देशातील नद्यांचे प्रदूषित भाग दोन वर्षांपूर्वी ३०२ होते ते यावर्षी ३५१ झाले असून, अतिशय गंभीररीत्या प्रदूषित झालेल्या नद्यांचे भाग (जेथे पाण्याचा दर्जा कसा आहे हे समजते) ३४ वरून ४५ झाले आहेत. हा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) काढला आहे.केंद्र सरकार गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबवत असून, प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी तो दृश्य स्वरूपातील प्रयत्न आहे. सीपीसीबीने बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांचे भाग हे प्रत्यक्ष महाराष्ट्र, आसाम आणि गुजरातमधील नद्यांपेक्षा खूप कमी प्रदूषित आहेत, असे म्हटले. नद्यांच्या प्रदूषित झालेल्या ३५१ भागांपैकी ११७ भाग हे या तीन राज्यांतील आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या शिफारशींच्या आधारे सीपीसीबीने गेल्या महिन्यात राज्यांना त्यांच्या नद्या किती प्रदूषित झाल्या आहेत, हे कळवले आहे. सीपीसीबीने प्रदूषित भागांकडे लक्ष वेधले आहे त्यात मिठी नदीत (पोवई ते धारावी) बीओडी (बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड) २५० मिलीग्रॅम/लिटर, गोदावरीत (सोमेश्वर ते राहेद) बीओडी ५.०-८० मिलीग्रॅम/लिटर, साबरमती (खेरोज ते वौथा) बीओडी ४.०-१४७ मिलीग्रॅम/लिटर आणि हिंडोन (सहारनपूर ते गाझियाबाद) बीओडी ४८-१२० मिलीग्रॅम/लिटर आहे.देशातील अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषितउत्तर प्रदेशातील नद्यांच्या प्रदूषित भागांच्या केलेल्या संकलनात गंगेत बीओडीचे प्रमाण ३.५-८.८ मिलीग्रॅम/लिटर असून, ही नदी प्रायोरिटी फोरमध्ये असल्याचे संकेत आहेत. गंगा नदीचे सांस्कृतिक महत्त्व मोठे असल्यामुळे तिच्यावर सतत प्रकाशझोत असतो; परंतु अनेक नद्या खूप प्रमाणात प्रदूषित आहेत, असे केंद्रीय जल संसाधन मंत्रालयातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण