दिल्लीत ७ फेब्रुवारी रोजी मतदान, १० ला निकाल
By Admin | Updated: January 12, 2015 17:43 IST2015-01-12T16:53:08+5:302015-01-12T17:43:10+5:30
गेल्या ११ महिन्यांपासून अधांतरी असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर १० फेब्रुवारी निकाल लागणार आहे.

दिल्लीत ७ फेब्रुवारी रोजी मतदान, १० ला निकाल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - गेल्या ११ महिन्यांपासून अधांतरी असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत आजपासून आचारसंहिता लागू होत आहे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून ११ हजार ७६३ मतदान केंद्रांवर १ कोटी ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. २१ जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारांना अर्जाचा प्रत्येक रकाना भरणे बंधनकारक असून मतदारांना या निवडणुकीत 'नोटा'चा वापर करता येणार असल्याचे व्ही. एस. संपत यांनी सांगितले.
दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८, भाजपाला ३१, आम आदमी पार्टीला २८ तर इतर पक्षाला ३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले होते.