शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 07:17 IST

नागालॅंडमध्ये सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात लाेकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. गेल्यावेळी म्हणजे २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर मतदान झाले हाेते. त्यासाठी ६९.५८ टक्के मतदान झाले हाेते. यावेळी १०२ जागांवर मतदान झाले. मात्र, मतदान घटून ६० टक्क्यांवर आले आहे.  दरम्यान,  वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ईनपीओ) या राज्यातील सात आदिवासी संघटनांच्या शिखर संस्थेने अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांतील मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला. सहा जिल्ह्यांतील ७३८ मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले होते. तेथे नंतरही मतदान झाले नाही.

आदिवासींनी प्रथमच केले मतदानपाेर्ट ब्लेअर : अंदमान आणि निकाेबार द्वीपसमुहातील ‘शाेम्पेन’ आदिवासीनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. ही आदिवासी जमाति विशेष संरक्षित जमातिंच्या प्रवर्गात येत. त्यातील ७ जणांनी मतदान केले.

निवडणूक आयाेगाने त्यांच्यासाठी वनविभागाच्या निवासी क्षेत्रात स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात आले हाेते. त्यांना यापूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत माहिती देण्यात आली हाेती. या जमातिच्या केवळ २२९ नागरिकांची नाेंद आहे. त्यापैकी ९८ जण मतदार आहेत. 

ईव्हीएमसह एसएसयूव्ही पाण्यात बुडाली- उत्तर लखमीपूर : मतदान झाल्यानंतर ईव्हीएम नेणारी एक एसयुव्ही नदीत बुडाली. ही गाडी एका बाेटीतून पैलतीरी नेण्यात येत हाेती. मात्र, पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे बाेट उलटली. - वाहनचालक आणि निवडणूक अधिकारी वेळीच वाहनातून बाहेर पडल्यामुळे बचावले.- अमरपूर भागात हे पथक बिघडलेले ईव्हीएम बदलण्यासाठी जात हाेते. 

आराेग्य, पाणी अन् शिक्षणासाठी ‘मूक’ गावाचे मतदान- देशातील ‘मूक’ गाव म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीरमधील ढडकही या गावाने चांगल्या आराेग्य सुविधा, पाणी, रस्ते आणि शिक्षणासाठी मतदान केले. - त्याचवेळी गावकऱ्यांनी या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.- गावातील सुमारे ९० टक्के कुटुंबातील लाेक मूकबधीर आहेत. उधमपूर मतदारसंघात येणाऱ्या ढडकहीत ३५ टक्के लाेकसंख्या मतदार आहे .

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान