शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा 'हात' राहणार की जाणार? १८ एप्रिलला होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:36 IST

काँग्रेसचा 'पंजा' संकटात

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेला 'पंजा'च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती.  भाजपचे नेते आणि वकील असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह अवैध ठरवावं, यासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती. 'निवडणूक आचारसंहितेनुसार, शरीराचा कोणताही अवयव निवडणूक चिन्ह असू शकत नाही. यासोबतच निवडणूक चिन्ह घेऊन कोणीही मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही, असाही नियम आहे  मात्र काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्यानं या दोन्ही नियमांचं उल्लंघन होतं,' असं सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असलेल्या उपाध्याय यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकमधील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. याठिकाणी काँग्रेससमोर भाजपचं कडवं आव्हान आहे. मात्र आता काँग्रेसचा 'पंजा'च संकटात सापडल्यानं पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाविरोधात उपाध्याय यांनी २९ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेस