नेहरू जयंतीवरुन राजकारण शिगेला
By Admin | Updated: November 12, 2014 02:40 IST2014-11-12T02:40:22+5:302014-11-12T02:40:22+5:30
काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत दोन दिवसांचे आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित केले आहे.

नेहरू जयंतीवरुन राजकारण शिगेला
मोदींना निमंत्रण नाही : आंतरराष्ट्रीय नेते उपस्थित राहणार
नवी दिल्ली : काँग्रेसने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत दोन दिवसांचे आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित केले आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठविलेले नाही.
विज्ञान भवनात 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी हे संमेलन होत असून 19 देशांमधील 52 नेत्यांनी सहभागी होण्याला सहमती दर्शविली आहे. काही देशांमधील 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांचाही त्यात समावेश आहे. मोदींना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी दिली आहे.
पंतप्रधानांना एवढय़ा मोठय़ा संमेलनाचे निमंत्रण का देण्यात आले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही योग्य तेच करीत आहोत. हे काँग्रेसचे संमेलन असून सरकारला त्याच्याशी काही देणोघेणो नाही. मोदी हे पर्यटक पंतप्रधान असून सध्या दहा दिवसांच्या विदेश दौ:यावर गेले आहेत, असा खुलासा केला.
हे संमेलन आयोजित करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना संपूर्ण जगभरातील नेत्यांकडून समर्थन मिळत आहे. जागतिक नेते सध्या जी-2क् शिखर परिषद आणि आसियान सारख्या परिषदांमध्ये व्यग्र असतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संमेलनात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. अनेक नेत्यांनी सहभागासाठी होकार दिला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
च्अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करजई, घानाचे जान कुफोर, नायजेरियाचे जन. आबो सांजो, भूतानच्या महाराणी अशी दोरजी वांगमो वांगचू, दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी अहमद कथाडा, अरब लीगच्या आम्रे मुसा स्पेशालिस्ट इंटरनॅशनलच्या अस्मा जहांगीर आणि सुनील खिलनानी आदी मान्यवर संमेलनात सहभागी होत आहेत.
च्काही देशांचे राजकीय पक्ष या संमेलनात आपले प्रतिनिधी पाठवत आहेत. आफ्रिकी नॅशनल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, बांगला देशची अवामी लीग, नेपाळी काँग्रेस, व्हिएतनामचा कम्युनिस्ट पक्ष, मलेशियाचा युएमएमओ आदी पक्षांचे प्रतिनिधी हजेरी लावतील, अशी माहिती शर्मा यांनी दिली.