केजरीवालांमुळे राजकारणाचा स्तर घसरला - अरुण जेटली

By Admin | Updated: December 24, 2015 18:53 IST2015-12-24T18:45:58+5:302015-12-24T18:53:02+5:30

अरविंद केजरीवाल आणि आप नेत्यांमुळे राजकारणाची पातळी खाली घसरली आहे अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला.

Politics of Kejriwal dropped due to Arun Jaitley | केजरीवालांमुळे राजकारणाचा स्तर घसरला - अरुण जेटली

केजरीवालांमुळे राजकारणाचा स्तर घसरला - अरुण जेटली

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ -  अरविंद केजरीवाल आणि आप नेत्यांमुळे राजकारणाची पातळी खाली घसरली आहे. पदावर असलेल्या व्यक्तींकडून असभ्यवर्तन अपेक्षित नसते अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला. 

डीडीसीएतील कथित भ्रष्टाचारावरुन आपकडून सातत्याने अरुण जेटली यांना लक्ष्य करण्यात येत असताना जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन आपला राजकीय मर्यादांचा विसर पडल्याची टीका केली. 
दिल्लीचे मुख्यमंत्री सभागृहात आणि सभागृहाबाहेर पंतप्रधान आणि अन्य नेत्यांबद्दल काय बोलले ? सरकारी पदावरील व्यक्ती अशा भाषेचा प्रयोग करत असेल तर, संतप्त प्रतिक्रियाच उमटतील असे जेटली म्हणाले. 
पदावर असलेल्या व्यक्तींकडून संयम बाळगण्याची अपेक्षा असते. असभ्य भाषेतून खोटे आरोप केले म्हणून ते सत्य ठरत नाहीत. असभ्यपणा भारतीय राजकारणाचा नवा आदर्श झाला आहे का ? असा प्रश्न जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन विचारला आहे. 

Web Title: Politics of Kejriwal dropped due to Arun Jaitley