ऑगस्ट क्रांती दिनावरून रंगले राजकारण
By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30
ऑगस्ट क्रांती दिनावरून रंगले राजकारण

ऑगस्ट क्रांती दिनावरून रंगले राजकारण
ऑ स्ट क्रांती दिनावरून रंगले राजकारण मुंबई- ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याकरिता एकही मंत्री फिरकला नसल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लागलीच सरकारच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन केले.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यास मुख्यमंत्र्यांनी जाण्याची प्रथा आहे. राज्यात आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री हजर राहत असत. मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मुंबईबाहेर असल्याने ते ऑगस्ट क्रांती मैदानावर जाऊ शकले नाहीत. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपा व रा. स्व. संघाचे योगदान नसल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या दिवसाचे महत्व वाटले नाही. ज्या हुतात्म्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना अभिवादन करण्याकरिता त्यांनी हजर राहायला हवे होते, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली हे अयोग्य असून रा. स्व. संघाचा कार्यक्रम राबवण्यास सरकारने सुरुवात केल्याचेच हे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर सरकारच्यावतीने शिक्षणमंत्री तावडे हे हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता ऑगस्ट क्रांती मैदानावर पोहोचले. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हुतात्म्यांच्या अभिवादनावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)