शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

राहुल गांधी ते PK, या जुन्या 'फॉर्म्युल्या'वर परततायत नेते; जनतेला साधण्यासाठी वापरतायत दिग्गजांची रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:12 IST

Political Yatra : काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज 26वा दिवस आहे. ही यात्रा तामिळनाडू आणि केरळमधून आता कर्नाटकात पोहोचली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्ष आणि नेते कामाला लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या काळातही नेते मंडळी बॅक टू बेसिक्स अर्थात जनसंपर्काच्या फॉर्म्युल्याकडे वळताना दिसत आहेत. गेल्या महिन्यातच राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशा ३,५७० किमीच्या 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली. यातच, रविवारी आणखी दोन यात्रांना सुरुवात झाली आहे. यात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलच्या (BJD) जनसंपर्क पदयात्रेचा आणि पश्चिम चंपारणमधील गांधी आश्रमातून बिहार निवडणुकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या 3,500 किमीच्या पदयात्रेचाही समावेश आहे.

पटनायक यांनी भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिराजवळून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर जन संपर्क कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी बीजेडी नेते आणि कार्यकर्त्यांनी ओडिशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी आपल्या या यात्रेदरम्यान बिहारमधील प्रत्येक पंचायत आणि ब्लॉकपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार, ही यात्रा पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने लागू शकतात, असे  म्हटले आहे.

किशोर यांनी भितिहरवा गांधी आश्रमापासून पदयात्रेला सुरुवात केली. गांधीजींनी 1917 मध्ये येथूनच पहिले सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते. या पदयात्रेला सुरुवात होताच रास्त्यावर लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकात -काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज 26वा दिवस आहे. ही यात्रा तामिळनाडू आणि केरळमधून आता कर्नाटकात पोहोचली आहे. यावेळी हा भारतीय राजकारणासाठी परिवर्तन आणि पक्षाच्या कायाकल्पासाठी 'निर्णायक संधी' आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

या नेत्यांनीही काढली होती भारत यात्रा - यापूर्वी वर्ष 1983 मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनहीही भारत यात्रेंतर्गत कन्याकुमारीपासून पदयात्रा सुरू केली होती. ही यात्रा 6 जानेवारी, 1983 ला सुरू झाली होती आणि सहा महिन्यानंतर दिल्लीत पोहोचली होती. यानंतर तत्कालीन पंतप्रधान तथा काँग्रेसाध्यक्ष राजीव गांधी यांनीही 1985 मध्ये मुंबईमध्ये एआयसीसीच्या पूर्ण सत्रात संदेश यात्रेची घोषणा केली होती. अखिल भारतीय काँग्रेसच्या सेवा दलाने ही यात्रा संपूर्ण देशात चालवली होती. यानंतर भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही रथ यात्रा काढली होती. 

भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली 1990मध्ये राम मंदिर आंदोलनाला गती देण्यासाठी ही यात्रा कढण्यात आली होती. सप्टेंबर 1990 मध्ये सुरू झालेली ही यात्रा 10,000 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर 30 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील अयोध्येत संपणार होती. मात्र, ती उत्तर बिहारमधील समस्तीपुरमध्ये अडवण्यात आली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीPrashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस