राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले -नरेंद्र मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 19:27 IST2015-12-14T19:27:07+5:302015-12-14T19:27:07+5:30
राजकीय पक्षांनी स्वताच्या फायद्यासाठी एकमेंकाशी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले आहे असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील सभेत म्हटले
राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले -नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. १४ - राजकीय पक्षांनी स्वताच्या फायद्यासाठी एकमेंकाशी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले आहे असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील सभेत म्हटले, ते केरळच्या दौऱ्यावर आहेत. केरळ येथे येण्यासाठी मला उशीर झाला आहे, त्याबद्दल मी माफी मागतो आहे, पण यापुढे असे होणार नाही. स्वातंत्र्यानंतर केरळचा राजकिय इतिहास पाहिला असता आपल्याला असे जाणवेल की इथे भाजपा आणि त्याच्या विचारसरणीला जास्त अत्याचाराचा सामना करवा लागला आहे असे ते म्हणाले.
भाजपा कार्यकर्त्यांनी केरळ मध्ये पक्षासाठी खूप मेहनत केली तरी तिथे कधी विजय मिळाला नाही, पण आजही त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत, मी त्यांना सलाम करतो . २०२२ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्ष होतील पर्यंत देशातील प्रतेक नागरीकाडे स्वतहाच घर असले पाहिजे हे माझे स्वप्न आहे असही त्यांनी सांगितलं.