शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांनी EVMचा फुटबॉल बनवलाय, मुख्य निवडणूक आयुक्तांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 20:36 IST

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू - गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमवर सातत्याने संशय घेतला जात आहे. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांनी इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे, असे सुनील अरोडा यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे पथक मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरोडा यांनी इव्हीएमवर संशय घेणाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ''काही महिन्यांपूर्वी कर्नाटकबरोबरच इतर पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निकाल लागले. मी सांगताना क्षमा मागतो, पण इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे. निकाल एक्स लागला तर इव्हीएम चांगल्या आणि निकाल वाय लागला तर इव्हीएम खराब, असे म्हटले जाते,''असे सुनील अरोडा म्हणाले. 

 इव्हीएम मतदान करत नाही. तर तुम्ही आम्ही मतदान करतो. त्यामुळे इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा इव्हीएमवर शंका घेतल्या जातात,'' अशी खंतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली. 

 गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर  सातत्याने शंका घेण्यात येत आहे. तसेच निवडणुका इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणीही सातत्याने होत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणIndiaभारत