राजकीय महानाट्यांनी दिल्ली तापली
By Admin | Updated: January 21, 2015 01:26 IST2015-01-21T01:26:31+5:302015-01-21T01:26:31+5:30
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण मंगळवारी अनेक राजकीय महानाट्यांनी तापले.

राजकीय महानाट्यांनी दिल्ली तापली
अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण मंगळवारी अनेक राजकीय महानाट्यांनी तापले. एकीकडे आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांना समर्थकांच्या गर्दीमुळे उमेदवारी अर्ज भरता आला नाही तर दुसरीकडे भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या कार्यालयात गोंधळ घातला. खुल्या चर्चेच्या आव्हानावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने सक्रिय होत ‘चुकीची वक्तव्ये करण्यापासून खबरदार...!’ असा इशारा देणारी नोटीस बजावली. एकूणच निवडणूक नाट्यांमुळे राजधानी नवी दिल्लीची थंडी मंगळवारी कुठच्या कुठे पळून गेली होती.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे(आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान धुडकावून लावत आपण केवळ विधानसभेत चर्चा करू, असे स्पष्ट केले आहे़ याउलट काँग्रेस नेते अजय माकन यांनी मात्र अशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे़
काल भाजपा नेतृत्वाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले होते़ यानंतर मंगळवारी दिल्लीतील निवडणूक वातावरण आणखी तापलेले दिसले़ आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र झालेला दिसला़ केजरीवाल यांनी भाजपा आणि काँग्रेसला खुल्या चर्चेचे आव्हान दिले़ मतदानापूर्वी अशी खुली चर्चा एक चांगली सुरुवात असेल कारण यामुळे दिल्लीच्या मुद्यांबाबत मुख्य पक्षांच्या योजना आणि धोरणांबाबत लोकांना कळू शकेल, असे केजरीवाल म्हणाले़ अर्थात किरण बेदी यांनी थेटपणे केजरीवालांचे आव्हान स्वीकारणे टाळले़ मी आव्हान स्वीकारते पण मी केवळ विधानसभेतच चर्चा करेल़ निवडणूक प्रचारादरम्यान नाही़, असे बेदी म्हणाल्या़
काँग्रेसचे अजय माकन यांनी केजरीवालांच्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचे स्वागत केले आहे, याकडे लक्ष वेधले असता, ते सर्व नाटक करण्यात गुंतले आहेत़ त्यांची हातमिळवणी आहे, असे बेदींनी स्पष्ट केले़ यानंतर आम आदमी पार्टीने किरण बेदींच्या या ‘नकारा’वर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्आप नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले, मात्र केजरीवालांना कामापेक्षा चर्चेतच अधिक रस असल्याचा टोला लगावत बेदी यांनी हे आव्हान धुडकावले.
किरणजी, कृपया मुझे अन ब्लॉक कर दें
च्किरणजी, मी आपल्याला टिष्ट्वटरवरून फॉलो करीत आलो आहे़ मात्र आता आपण मला टिष्ट्वटरवर ‘ब्लॉक’ केले आहे़ कृपया मला ‘अनब्लॉक’ करावे, अशी विनंती सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय राहणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी यांना केली आहे़
केजरीवाल अर्ज न भरताच परतले
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गर्दीच्या प्रचंड रेट्यामुळे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरता आला नाही़ ते बुधवारी उमेदवारी अर्ज भरतील़ वाल्मिकी मंदिरापासून केजरीवालांचा रोड शो सुरू झाला़ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना दोन वाजेपर्यंत शहाजहां मार्गावरील जामनगर हाऊसमधील एसडीएम चाणक्युपरी कार्यालयात पोहोचायचे होते़ मात्र प्रचंड गर्दीमुळे केजरीवालांचा रोड शो पुढेच सरकू शकला नाही व त्यांना उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले़ दरम्यान किरण बेदी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत़
भाजपा मुख्यालयात इच्छुकांचा गोंधळ
दिल्लीतील भाजपा मुख्यालयी मंगळवारी तिकीट इच्छुकांच्या गोंधळाचे ‘महानाट्य’ पाहायला मिळाले़ पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना तिकीट न दिल्याच्या विरोधात त्यांच्या समर्थकांनी भाजपा कार्यालयाबाहेर गोंधळ घालत़ पक्षनेतृत्वाविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली़ भाजपाच्या तिकिटासाठी इच्छूक असलेल्या शिखा राय,अभय दुबे यांचे समर्थकही आपल्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ पक्ष नेतृत्वाविरोधात घोषणाबाजी करताना दिसले़ उपाध्याय यांनी आपल्या समर्थकांना शांत करण्याचे प्रयत्न केले़ मात्र समर्थकांनी उपाध्याय यांना महरौली मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी करीत घोषणाबाजी सुरूच ठेवली़
प्रचारासाठी रिंगणातून बाजूला झालो -उपाध्याय
आपल्या समर्थकांना शांत करताना निवडणूक न लढण्याचा निर्णय माझा स्वत:चा असल्याचे उपाध्याय यांनी स्पष्ट केले़ मी सर्व ७० जागा लढवू इच्छितो़ मला निवडणूक प्रचारावर लक्ष द्यायचे आहे़ निवडणूक लढण्याचा निर्णय त्यामुळेच मी ऐनवेळी मागे घेतला, असे ते म्हणाले़