शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

असे आहे राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाचे राजकीय समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 13:10 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील ज्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तो मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तिरुवनंतपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज काँग्रेसने केली. या घोषणेबरोबरच राहुल गांधींच्या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील ज्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तो मतदारसंघ भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच येथील राजकीय गणितही खास आहे. 2014 मध्ये झाली होती अटीतटीची लढतकेरळमधील वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथून काँग्रेसने बाजी मारलेली आहे. या मतदारसंघात तिरुवंबडी, वानदूर, सुल्तानबथेरी, एरनाड, कलपत्ता आणि निलंबूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, 2014 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला या मतदासंघातून केवळ 20 हजार 870 मतांनी विजय मिळाला होता. त्यावेळी काँग्रेसचे एम. आय. शानवाझ यांना 3 लाख 77 हजार 035 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या एलडीएफच्या सत्यन मोकेरी यांना 3 लाख 56 हजार 165 मते मिळाही होती. तसेच भाजपाच्या पी.आस. रस्मिलनाथ यांना 80 हजार 752 मते मिळाली होती.  2009 मध्ये मात्र काँग्रेसने मिळवला होता मोठा विजय मात्र 2009 मध्ये या मतदारसंघात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी यूडीएफ(काँग्रेस) च्या एमआय शानवाझ यांनी एलडीएफच्या एम. रहमतुल्ला यांना 1 लाख 53 हजार 439 मतांनी पराभूत केले होते. त्यावेळी शानवाझ यांना 4 लाख 10 हजार 703 तर रहमतुल्ला यांना दोन लाख 57 हजार 264 मते मिळाली होती. असे आहे वायनाडमधील समीकरण2011 च्या जनगणनेनुसार वायनाड जिल्ह्याची एकूण लोकसंखा  8 लाख 17 हजार 420 एवढी आहे. त्यात 4 लाख 01 हजार 684 पुरुष आणि  4 लाख 15 हजार 736 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 89.03 टक्के एवढे आहे. एकूण लोकसंख्येपैकी 4 लाख 4 हजार 460 (49.48टक्के) हिंदू आहेत. तर 2 लाख 34 हजार 135 (28.65 टक्के) मतदार मुस्लिम आहेत. तसेच 1 लाख 74 453 (21.34 टक्के) मतदार ख्रिश्चन आहेत.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसKeralaकेरळ