शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ नावामुळे राजकीय वादंग; चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:04 IST

चर्चा न झाल्याने काही पक्ष नाराज

हरीश गुप्ता नवी दिल्ली :  : २६ विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुजिव्ह अलायन्स (इंडिया) असे नाव देण्यात आले आहे. मात्र या आघाडीला ‘इंडिया’ नाव देणे अयोग्य असल्याचे त्यातील काही घटक पक्षांच्या नेत्यांचे मत आहे. इंडिया हे नाव जाहीर करण्याआधी त्याबाबत घटक पक्षांशी सविस्तर चर्चा करायला हवी होती असेही या नेत्यांना वाटते. इंडिया नावावर भाजपप्रणित एनडीएनेही टीका केली होती.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची बंगळुरू येथे बुधवारी बैठक सुरू असताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ‘चक दे इंडिया’ असे ट्वीट केले होते. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे खासदार माणिक टागोर यांनी जितेगा इंडिया असे ट्विट केले. उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये इंडिया या शब्दाचा तीनदा वापर केला. या सर्व ट्वीटमुळे गोंधळ निर्माण झाला. इंडिया असे नाव दिल्याने नितीशकुमार नाराज झाले नाहीत, असे जनता दल (यू)चे अध्यक्ष ललनसिंह यांनी स्पष्ट केले. 

विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बंगळुरू येथील बैठकीला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने असा दावा केला की,  आघाडीला काय नाव द्यायचे यावर सविस्तर चर्चा झाली होती. सरतेशेवटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया या नावाचा आग्रह धरला व तो इतर घटक पक्षांनी मान्य केला. 

‘जीतेगा भारत’ टॅगलाइन

nविरोधी पक्षांनी आघाडीसाठी ‘इंडिया’ नावाची घोषणा केल्यानंतर एका दिवसाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘जीतेगा भारत’ ही टॅगलाइन निवडली आहे.nसूत्रांनी सांगितले की, ही टॅगलाइन बहुधा विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करून वापरली जाईल. मंगळवारी बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना वाटले की आघाडीच्या नावात ‘भारत’ हा शब्द देखील समाविष्ट करावा. त्यामुळे त्याचा वापर टॅगलाइनमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBengaluruबेंगळूर