पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:02+5:302015-02-15T22:36:02+5:30
नागपूर : स्वस्तात दागिने पॉलिश करून देण्याची बतावणी करून दोघांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. सदर बस्तरवारी मोहल्ल्यातील माता मंदिराजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली.

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास
न गपूर : स्वस्तात दागिने पॉलिश करून देण्याची बतावणी करून दोघांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. सदर बस्तरवारी मोहल्ल्यातील माता मंदिराजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली.मेघा दुर्गेश पारखेडकर (वय २९) यांच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० वाजता दोन तरुण आले. अवघ्या ३० रुपयात सोन्याचांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, अगदी नव्यासारखे तुमचे दागिने दिसतील, असे सांगून आरोपींनी मेघा यांना विश्वासात घेतले. मेघा यांनी आपल्याकडील २६ हजारांचे दागिने आरोपींच्या हातात दिले. आरोपींनी ते एका भांड्यात टाकले आणि नजर चुकवून काढून घेतले. आरोपी निघून गेल्यानंतर भांडे उघडून पाहिले असता आरोपींनी दागिने चोरून नेल्याचे उघड झाले. मेघा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. ----