शस्त्रपरवाने होणार जमा, पोलिसांची मोहीम सुरू
By Admin | Updated: September 25, 2014 04:17 IST2014-09-25T04:17:52+5:302014-09-25T04:17:52+5:30
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आजपासून खासगी शस्त्र परवाने जमा करण्याची मोहिम सुरू केली आहे

शस्त्रपरवाने होणार जमा, पोलिसांची मोहीम सुरू
मुंबई : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आजपासून खासगी शस्त्र परवाने जमा करण्याची मोहिम सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले, उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सरसकट सर्व खासगी शस्त्र परवाने जमा केले जाणार नाहीत.
शस्त्र परवाना असलेल्या खासगी व्यक्तींपैकी कोणाचा परवाना जमा करून घ्यायचा, याची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी तयार करण्यापुर्वी परवाना का जमा करावा यावरही विचार करण्यात आला आहे. ही मोहिम आजपासून सुरू झाली असून लवकरच यादीत नमूद परवाने जमा होतील. मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत प्रतिबंधात्मक कारवाईसाठी यादी तयार करण्यात आली होती. नवी यादी तयार होत असून या यादीत असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.