पाच वर्षानंतरच होणार पोलिसांची बदली

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

पाच वर्षानंतरच होणार पोलिसांची बदली

Police will be transferred after five years | पाच वर्षानंतरच होणार पोलिसांची बदली

पाच वर्षानंतरच होणार पोलिसांची बदली

च वर्षानंतरच होणार पोलिसांची बदली
- अध्यादेश जारी: बदल्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण
यदु जोशी
मुंबई - राज्यातील पोलिस शिपायांपासून अधिकार्‍यांपर्यंत बदल्यांचे अधिकार निि›त करण्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी जारी केला आहे. त्यानुसार पोलीस शिपायाची बदली आता पाच वर्षांपर्यंत होणार नाही. आतापर्यंत दोन वर्षांनंतर ही बदली व्हायची.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असून बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने त्यांच्या विभागाने अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांकडे पाठविला होता. त्याला राज्यपालांनी आज मंजुरी दिली.
आतापर्यंत पोलीस शिपायांच्या बदल्यांचे अधिकार ग्रामीण भागात पोलीस महानिरीक्षकांकडे होते. आता ते जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. आयुक्तालयामध्ये ते पोलीस आयुक्तांना असतील.
साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या जिल्‘ांतर्गत बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाला असतील. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस उपअधीक्षकाचा समावेश असेल. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या जिल्‘ाबाहेर बदल्या करण्याचे अधिकार पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाला असेल. आयुक्तालय हद्दीत हे अधिकार शहर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील मंडळाला असेल.
-------------------------------
सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा मार्च-एप्रिलमध्ये नियमित स्वरुपाच्या बदल्या केल्या जातात. या कालावधी व्यतिरिक्त पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार आजवर मुख्यमंत्र्यांना होते. आता ते पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षखतेखालील आस्थापना मंडळाकडे असतील.
-------------------------------

Web Title: Police will be transferred after five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.