पोलिसांनी गँगस्टर समजून नेत्याचा केला एन्काऊंटर

By Admin | Updated: June 17, 2015 11:36 IST2015-06-17T11:36:42+5:302015-06-17T11:36:42+5:30

गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्याने वाद निर्माण झाला झाला आहे.

The police threw an encounter with the gangster | पोलिसांनी गँगस्टर समजून नेत्याचा केला एन्काऊंटर

पोलिसांनी गँगस्टर समजून नेत्याचा केला एन्काऊंटर

ऑनलाइन लोकमत 

अमृतसर, दि. १७ - गँगस्टर समजून अमृतसर पोलिसांनी अकाली दलाच्या नेत्याचा एन्काऊंटर केल्याने वाद निर्माण झाला झाला आहे. साध्या वेशात आलेल्या पोलिसांवर या नेत्याने पिस्तूल रोखले व यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. ही घोडचूक लक्षात येताच पोलिस घटनास्थळावरुन पसार झालेत. 
अमृतसर येथे काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांची तस्करी करणारा सोनू कांगला या आरोपीला गँगस्टर जसदीप सिंग उर्फ जग्गूने पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्यात मदत केली होती. तेव्हापासून अमृतसर पोलिसांची अंमलीपदार्थ विरोधी शाखा जग्गूच्या शोधात आहे. मंगळवारी संध्याकाळी जग्गू त्याच्या आय २० या कारमधून वेरका येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांचे पथक वेरकाकडे जाणा-या रस्त्यावर सापळा रचून बसले होते. याच दरम्यान आय २० या कारमधून अकाली दलाचे नेते मुखजित सिंग मुक्खा हेदेखील वेरकाच्या दिशेने जात होते. आय २० कारमध्ये जग्गूच आहे या गैरसमजूतीतून पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत गाडीला थांबवले.  दुसरीकडे मुक्खा यांची काही जणांशी पूर्ववैमनस्य असून याच वादातून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घरावर गोळीबारही झाला होता. साध्या वेशात गाडीला गराडा घालून उभे असलेले पोलिस हे विरोधी गटाचे गुंड आहेत असे मुक्खा यांना वाटले. त्यांनीदेखील स्वतःकडील पिस्तूल पोलिसांवर रोखली. मुक्खा यांनी पिस्तूल बाहेर काढताच पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला व या गोळीबारात मुक्खा यांचा मृत्यू झाला. 
आय २० गाडीत जग्गू नसून अकाली दलचे नेते मुक्खा असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिथून पळ काढला. मुक्खा यांच्या गाडीवर नंबर प्लेट नसल्याने पोलिसांचा गोंधळ झाला व पहिली गोळी मुक्खा यांच्याकडूनच झाडण्यात आली असा दावा पोलिसांनी केला आहे. तर चूक लक्षात आल्यावर पोलिसांनी गाडीची नंबर प्लेट काढून घेतली असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अमृतसर पोलिसांच्या या निष्काळजीपणाविरोधात अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. 

Web Title: The police threw an encounter with the gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.