क्रिकेट स्पर्धेत पोलीस संघ विजयी
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:29+5:302015-03-14T23:45:29+5:30
नवी मुंबई : वाशी येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये पोलिसांच्या संघाने अंतिम सामन्यात एल अँड टीच्या संघावर मात करून सलग तिसर्यांदा विजतेपद पटकावले. नवी मुंबई क्रीडा संकुलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती.

क्रिकेट स्पर्धेत पोलीस संघ विजयी
न ी मुंबई : वाशी येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये पोलिसांच्या संघाने अंतिम सामन्यात एल अँड टीच्या संघावर मात करून सलग तिसर्यांदा विजतेपद पटकावले. नवी मुंबई क्रीडा संकुलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती.नेहमी गुन्हेगारांशी सामना करणार्या पोलिसांच्या पथकाने विरोधी संघासोबत फलंदाजी व गोलंदाजीचा सामना केला. रोहन तांडेल व विशाल वाघ यांच्या जोडीने फटकेबाजी केली. त्यानुसार विजयासाठी एल अँड टी संघापुढे १७७ धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान स्वीकारत एल अँड टी संघ मैदानात उतरूनही अधिक काळ टिकू शकला नाही. संघाचे प्रशिक्षक सहाय्यक निरीक्षक सुभाष शिंदे यांच्यासह संपूर्ण पथकाचे आयुक्त के. एल. प्रसाद यांनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)फोटो. १४ पोलीस क्रिकेट