शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनाच्या दिवशीच वेतनासाठी आंदोलन करणा-या शिक्षकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:07 IST

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लखनऊ, दि. 5 - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक शिक्षक 3 वर्षांचं थकीत वेतन मिळावं, यासाठी आंदोलन करत होते. सर्व शिक्षकांनी मिळून उत्तर प्रदेश विधानसभेला घेराव घालण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.लाठीचार्जमुळे विरोध प्रदर्शन करणारे अनेक शिक्षक जखमी झाले. तसेच एक महिलाही बेशुद्ध झाली. लखनऊमध्ये पोलिसांनी शिक्षकांवर जोरदार लाठीचार्ज केला. शिक्षक गेल्या 40 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे नाराज होते. वेतन मिळण्याच्या मागणीसाठी लखनऊमधल्या चारबागमध्ये अनेक शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी उत्तर प्रदेश विधानभवनाच्या दिशेनं कूच केलं.पोलिसांनी त्यांना बर्लिंग्टन चौकात रोखलं. मात्र तरीही शिक्षक ऐकत नसल्याचं पाहून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आदर्श प्रेरक शिक्षकांना 2 हजारांचं मानधन दिलं जातं. परंतु गेल्या 40 महिन्यांपासून त्यांना हे मानधन मिळालं नाहीये. आदर्श प्रेरक शिक्षक हे सरकारची योजना गावागावात पोहोचवण्याचं काम करतात. 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी 6 सप्टेंबर रोजी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अनवाणी अध्यापनाद्वारे निषेध आंदोलन करणार आहेत. तसेच 5 सप्टेंबरला दिल्लीत ऑल इंडिया फेडरेनशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनने (एआयफुक्टो) ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे.राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने फक्त 1 हजार 628 शाळांना 20 टक्के अनुदान दिले आहे. त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक ‘आत्मक्लेष दिन’ म्हणून पाळणार आहेत. तसेच ते 6 सप्टेंबरला अनवाणी अध्यापन करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. एआयफुक्टोनेही 5 सप्टेंबरला दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई विद्यापीठासह राज्यातील, इतर विद्यापीठांतील प्राध्यापक त्यांच्या विविध मागण्यांसाठी यात सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनने दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश