जयपूर : दरोडे आणि बलात्काराच्या घटनांकडे दुर्लक्ष करून राजस्थानची राजधानी जयपूर येथील पोलीस चक्क मंत्र्याचा हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी कामाला लागल्याची अजब घटना घडली. राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांचा हरवलेला पाच महिन्यांचा कुत्रा ‘चार्ली’ अखेर सापडला़ चार्ली सापडताच स्थानिक पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ तीन दिवसांपूर्वी शहरात दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा घातला होता आणि त्यानंतर त्या घरातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता़ काल राठोड यांच्या घरी तैनात कर्मचाऱ्याने चार्ली हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली होती़ यानंतर पोलीस त्याला शोधण्यासाठी सक्रिय झाले होते़ आज एका गृहस्थाने चार्लीला स्वत: राठोड यांच्या बंगल्यावर आणून सोडले़ शनिवारी चार्ली रस्त्यावर भटकत असताना, बेवारस समजून या गृहस्थाने त्याला आपल्या घरी नेले होते़ मात्र वृत्तपत्रात चार्ली हरविल्याच्या बातम्या वाचून त्याने चार्लीला स्वगृही पाठविणेच पसंत केले. त्याने स्वत: चार्लीला मंत्र्यांच्या घरी आणून सोडले आणि तिकडे पोलिसांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.
मंत्र्यांचे कुत्रे शोधण्यासाठी पोलिसांची फौज
By admin | Updated: September 23, 2014 04:24 IST