शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 17:33 IST

दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची अपहरण करून हत्या केल्यापासून देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. हे वृत्त चुकीचे आणि देशविरोधी तत्त्वांकडून दिशाभूल करण्यासाठी पेरण्यात आले आहे, असे गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने सांगितले आहे.  काश्मीरमध्ये आमचे ३० हजारहून अधिक एपीओ तैनात आहेत. त्यांच्या सेवाकाळाचे आकलन करून त्यांना वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते. आता प्रशासकीय कारणांमुळे ज्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे गृह मंत्रालयाने सांगितले.   गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जात आहे.  गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण केले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आली. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. 

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर