जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

By Admin | Updated: October 7, 2016 22:45 IST2016-10-07T22:15:31+5:302016-10-07T22:45:23+5:30

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून दोन जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Police martyrs in a terrorist attack in Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 07 - जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शोपियां जिल्ह्यातील जमनागेरी येथील एका पोलीस चौकीवर गोळीबार केला. या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला. तर, दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, येथील एक नागरिक सुद्धा या हल्ल्यात जखमी झाला आहे.

 

Web Title: Police martyrs in a terrorist attack in Jammu and Kashmir