काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस शहीद, ३ जखमी
By Admin | Updated: July 26, 2014 11:32 IST2014-07-26T11:32:36+5:302014-07-26T11:32:53+5:30
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस शहीद, ३ जखमी
ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २६ - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास दहशवाद्यांनी सोपोर गावात हा हल्ला केला. गेल्या २४ तासांतील हा दुसरा हल्ला आहे.
अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सोपोरच्या मुख्य चौकात पोलिसांवर ग्रेनेड फेकत हल्ला केला, तसेच गोळीबारही केला. यात एक पोलिस शहीद झाला असून इतर जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही.