काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:44 IST2018-07-22T01:42:17+5:302018-07-22T01:44:08+5:30
अतिरेक्यांचे महिन्याभरात तिसरे गैरकृत्य

काश्मीरमध्ये पोलिसाची अपहरणानंतर केली हत्या
श्रीनगर : येथील एका पोलीस शिपायाचे काही दहशतवाद्यांना त्यांच्या घरातून शनिवारी सकाळी अपहरण करून नंतर हत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला.
कथुआमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सलीम शाह सध्या रजेवर होते. कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील त्यांच्या घरातून अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच आणखी एका पोलीस व जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. नंतर त्यांना मारून टाकण्यात आले.
अनंतनाग जिल्ह्यातही आज अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मट्टनस्थित बमजू भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. (वृत्तसंस्था)