पोलिसांनी गाईला वाचवण्याच्या नादात महिलेच्या अंगावर घातली जीप
By Admin | Updated: June 3, 2017 17:37 IST2017-06-03T17:37:25+5:302017-06-03T17:37:25+5:30
उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे पोलिसांच्या अनियंत्रित जीपने गाईला वाचवण्याच्या नादात दोन लहान मुलांसाह चार जणांना चिरडलं

पोलिसांनी गाईला वाचवण्याच्या नादात महिलेच्या अंगावर घातली जीप
>ऑनलाइन लोकमत
बलरामपूर, दि. 3 - उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे पोलिसांच्या अनियंत्रित जीपने गाईला वाचवण्याच्या नादात दोन लहान मुलांसाह चार जणांना चिरडलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हरैया कस्बे परिसरात 60 वर्षीय उषा देवी आपल्या दोन नातवंडांसोबत फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांची जीप गाईला वाचवण्याच्या नादात अनियंत्रित झाली, आणि फुटपाथवर उभ्या असलेल्या चौघांच्या अंगावर चढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण उपेंद्र गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जीपचालक राजकुमार मिश्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु केला असल्याचं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे.