सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार पोलीस अधीक्षकांनी घेतली इंटरनेट कॅफे चालकांची बैठक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:48+5:302015-02-14T23:51:48+5:30
अकोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरातील इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार पोलीस अधीक्षकांनी घेतली इंटरनेट कॅफे चालकांची बैठक
अ ोला: व्हॉट्स ॲप, फेसबुकच्या माध्यमातून सायबर क्राइम घडविण्याचे प्रकार अनेकदा घडतात. फेसबुक, व्हॉट्स ॲपद्वारे अश्लील चित्रफिती, देवी-देवतांचे विटंबनात्मक छायाचित्रे व मजकूर टाकून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते. इंटरनेटच्या माध्यमातून घडणारा सायबर क्राइम रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरातील इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. शहरामध्ये सातत्याने सायबर क्राइमचे गुन्हे उघडकीस येत आहेत. सायबर क्राइमच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासोबतच, इंटरनेट बँकिंगद्वारे आर्थिक फसवणूक, अश्लील चित्रफिती व मजकुराच्या माध्यमातून बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी दहशतवादविरोधी कक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी इंटरनेट कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना कॅफेसाठी लागणारे परवाने कोणते, काय दक्षता घेतली पाहिजे. तसेच सायबर कॅफेमध्ये ग्राहकांकडून फोटो आयडी प्रूफची प्रत ठेवावी आणि कॅफे चालकाने ग्राहकांबाबत रजिस्टरमध्ये नोंदी ठेवाव्यात. कॅफेमध्ये आय कॅफे या सॉफ्टवेअरचा उपयोग करावा. सीसी कॅमेरे लावून खबरदारी घ्यावी. अशा सूचना केल्या. तसेच संशयित व आक्षेपार्ह आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती कळविण्यास पोलीस अधीक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी) 00000000000000000000