शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 20:03 IST

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका भावी डॉक्टरची प्रेम प्रकरणात फसवणूक करण्यात आली. पीडितेने माहिती देताच स्थानिक पोलिसांनी डॉक्टरलाअटक केली आहे. खरं तर एका एमबीबीएस विद्यार्थिनीने डॉक्टरवर लग्नाच्या बहाण्याने दोन वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अतुल शेखर असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

दरम्यान, आरोपी डॉक्टर अतुल शेखर हा गया मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आधी मुझफ्फरपूर येथील SKMCH मध्ये तैनात होता. तिथे वैद्यकिय शिक्षण घेत असलेल्या पीडितेसोबत त्याची भेट झाली होती. भेटीनंतर दोघांचा संवाद वाढला अन् त्यांनी मैत्री केली. हळू हळू त्यांची जवळीक वाढली.

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचारपीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अतुल शेखरने लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीने आरोपी डॉक्टरावर लग्नासाठी दबाव टाकला असता तिला गया येथील एका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरने पीडितेशी बोलणे देखील बंद केले होते. यानंतर पीडितेने मुजफ्फरपूरमधील अहियापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मुझफ्फरपूर पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपी डॉक्टर जिथे होता ते हॉस्पिटल गाठले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपीने लपण्याचा प्रयत्न केला. आरोपी डॉक्टर हॉस्पिटलच्या केबिनमध्ये घुसला. बराच वेळ वाट पाहूनही आरोपी बाहेर न आल्याने पोलिसांनी केबिनमध्ये जाऊन त्याला बाहेर आणले.

आरोपीला फरफटत नेलेदरम्यान, डॉक्टर हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यास तयार नव्हता. मग संतापलेल्या पोलिसांनी त्याला फरफटत बाहेर आणले अन् रुग्णालयातून अटक केल्याची माहिती दिली. पोलीस टीमसोबत आलेल्या एसआय बबिता कुमारी यांनी सांगितले की, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने डॉ. अतुल शेखर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर मुजफ्फरपूर पोलीस आरोपी डॉक्टरला अटक करण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, आता पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टdoctorडॉक्टरsexual harassmentलैंगिक छळArrestअटक