शिर्ला येथील पोलीस फायरिंग रेजची कोनशिला फोडली
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
शिर्ला : अकोला-पातूर मार्गावरील पोलीस फायरिंग रेजमधील कोनशिला अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. अकोला-पातूर मार्गावरील खुल्या जागेवर पोलीस अधिकारी-कर्मचारी गोळीबाराचा सराव करतात. यासाठी मोठे आठ ओटे तयार करण्यात आले आहेत. फायरिंग रेंजचे उद्घाटन तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी, पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले होते. (वार्ताहर)

शिर्ला येथील पोलीस फायरिंग रेजची कोनशिला फोडली
श र्ला : अकोला-पातूर मार्गावरील पोलीस फायरिंग रेजमधील कोनशिला अज्ञात व्यक्तीने फोडल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पातूरचे ठाणेदार खिल्लारे यांनी सांगितले. अकोला-पातूर मार्गावरील खुल्या जागेवर पोलीस अधिकारी-कर्मचारी गोळीबाराचा सराव करतात. यासाठी मोठे आठ ओटे तयार करण्यात आले आहेत. फायरिंग रेंजचे उद्घाटन तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी, पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले होते. (वार्ताहर)--------------------------खेर्डा भागाई-दोनद मार्गावर अपघातपिंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा भागाई-दोनद मार्गावर गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. दोनद खुर्द येथे आसारामातेचे दर्शन घेऊन प्रभाकर काशीराम मसराम आणि त्यांचे धुर्वे नामक साळू खेर्डा भागाईकडे एमएच-३०-डब्ल्यू-६५७२ क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. दोनदजवळ एका रानडुकराने दुचाकीच्या दिशेने उडी घेतल्याने दोघेही दुचाकीस्वार कोसळले. या अपघातात प्रभाकर मसराम यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, उमेश बिल्लेवार, गोपाल पुसदकर, ज्ञानेश्वर म्हसाये, धीरज राऊत, मंगेश बिल्लेवार, गोलू जाधव, लखन सुरडकर, अविनाश जाधव, रवि सुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)