शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कॉल डिटेल मागवण्याचे अमर्याद अधिकार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:29 IST

तपासाशी संबंध नसताना सीडीआर मागविणे अयोग्य

डॉ. खुशालचंद बाहेती

बंगळुरु : गोपनीयतेच्या उल्लंघनावर कठोर भूमिका घेत कर्नाटक हायकोर्टाने एका महिला पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात पीएसआयवर एका महिलेचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) बेकायदेशीरपणे मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीएसआय विद्या एम. व्ही. यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या छेडछाड, विश्वासघात, धमकी आणि विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. भावना एस. या महिलेने विद्या यांनी इतर काही आरोपींसोबत संगनमत करून तिचे कॉल डिटेल्स मिळवून दुसऱ्याला दिले व त्यांचा गैरवापर करून तिला त्रास दिल्याचा आरोप केला. या प्रकरणात अजिबात संबंध नसणाऱ्या अधिकाऱ्याने सीडीआर मागवल्याचे उघड झाले होते.

तपासाशी संबंध नसताना सीडीआर मागविणे अयोग्य

न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांनी याचिका फेटाळताना स्पष्टपणे सांगितले, केवळ पोलिस आहे म्हणून नागरिकांचा सीडीआर मागवू शकत नाही. पीएसआय विद्या या तक्रारदार महिलेविरोधातील कोणत्याही तपासाचा भाग नव्हत्या. त्यांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया न पाळता सीडीआर मागविले. मंजुरीची गरज तेव्हाच उ‌द्भवते, जेव्हा अधिकारी अधिकृत व कायदेशीर कर्तव्य बजावत असतो. तपासाशी काहीही संबंध नसताना सीडीआर मागवणे हे अधिकृत कृत्य मानले जाऊ शकत नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला की, सीडीआर अधिकृत कर्तव्याच्या अनुषंगाने मागविला होता. सीआरपीसी कलम १९७ तसेच कर्नाटक पोलिस कायद्याच्या कलम १७० अंतर्गत पूर्वमंजुरीशिवाय फौजदारी खटला चालविता येणार नाही. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय