माजी नगराध्यक्षाच्या घरावर दरोडाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30
तलवारीचा धाक दाखवून ४० तोळे दागिन्यांसह ९ लाखांची केली होती लूट : लुटीतील ५ तोळे सोने जप्त

माजी नगराध्यक्षाच्या घरावर दरोडाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी
त वारीचा धाक दाखवून ४० तोळे दागिन्यांसह ९ लाखांची केली होती लूट : लुटीतील ५ तोळे सोने जप्त सासवड : सासवडचे माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका नीलिमा चौखंडे यांच्या चौखंडे आळी येथील बंगल्यावर दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ९ ते १० लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. तीन महिन्यांनंतर या दरोड्याचा शोध लावण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांनी दिली. विशाल ऊर्फ बंजारा शरद पवार (वय २२, रा. काळे शिवार, शितोळे वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) या प्रमुख दरोडेखोरास अटक केल्यानंतर सासवडच्या दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार यांनी त्यास १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजय वसंत शिंदे (वय ४०) आणि देवानंद वसंत शिंदे (वय ३०, दोघेही रा. शिंदवणे, ता. हवेली) या दरोडेखोरांना २ मे रोजी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत दरोडेखोरांनी आणखी तीन आरोपींची नावे सांगितली आहेत. अण्णा वसंत शिंदे, (रा. पांचाळमळा, शिंदवणे), तिवार शरद पवार (रा. शिंदवणे ता. हवेली) आणि किशोर मक्कन पवार (रा. मुंबई वस्ती, पोंढे, ता. पुरंदर) अशी आरोपींची नावे असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आणखी मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली असता, सर्व आरोपींना दि. १९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रमुख दरोडेखोर बंजारा शरद पवार याचा सासवडमधील मागच्या वर्षी झालेल्या एका घरफोडीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ात अटक केलेले व नावे निष्पन्न झालेले बहुतेक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तिवार शरद पवार हा प्रमुख दरोडेखोर बंजारा पवार याचा सख्खा भाऊ आहे. तर अण्णा मक्कन पवार हा बंजाराचा सासरा आहे. तसेच अजय शिंदे आणि देवानंद शिंदे हे दोघे भाऊ आहे. आरोपीने चौखंडे यांच्यासह लोणी काळभोर, सोरतापवाडी या परिसरात गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सासवड येथील तालुका न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर झालेल्या ओळख परेडमध्ये चौखंडे कुटुंबीयांनी त्यास ओळखले आहे. त्याचबरोबर दरोड्यातील दागिने २ सोनारांना विकल्याचे कबूल केले आहे.